(राहुल हंडोरे यांजकडून)अंबरनाथ दिं.६एप्रिल२०२५“प्रवासी संचार” ऑनलाईन डिजीटल वृत्तसेवा.
आपल्या सर्वांचा बाप एक आहे तो म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर.हा जयंतीचा काळ सुरु आहे अंबरनाथ मध्ये 40 वर्ष जयंती सुरु आहे.त्यामुळे नगरपरिषदेच्या उद्यानाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे नाव मिळालं आहे.या जयंतीच्या काळात प्रा.डॉ.अरुण अहिरराव यांच जाण हे क्लेशदायक आहे असे उदगार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर} पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्याम गायकवाड यांनी प्रा. अहिरराव यांच्या श्रद्धांजली सभेत काढले.प्रा.डॉ.अरुण अहिरराव यांच्या आकस्मित निधना निमित्त अंबरनाथ पूर्वेला कैलासनगर येथील क्लब हाऊस मध्ये श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी बौद्धाचार्य भूषण भाले यांनी धार्मिक विधी कार्यक्रम आटोपला.त्या नंतर जाहीर श्रद्धांजली सभेत अनेक मान्यवरांनी प्रा.अहिरराव यांच्या आठवणी जागवल्या.

मंत्रालयातील माजी सचिव व सुप्रसिद्ध गायक आय एम.मोरे म्हणाले की,प्रा.अहिरराव हे गायक,कवी,वक्ता,नाट्य कलाकार अशा विविध भूमिका साकारणारा जिवलग मित्र मी गमावला आहे.प्रा.डॉ.विठ्ठल शिंदे म्हणाले की,तथागत बुध्दाच्या मृत्यू समई भन्ते आनंद रडत होते तेव्हा तथागत म्हणाले की,तुम्हाला बुद्ध समझला,धम्म समझला तर चिंता करू नका,शोक करू नका,जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यूला सामोरे जावेच लागते.पॅन्थर नेते प्रा.एकनाथ जाधव म्हणाले की,संघर्ष करून आम्ही जे कमावले आहे त्याचा आदर्श तरुणांनी घ्यावा आणि समाज प्रबोधन करावे,प्रा.डॉ.काजळे म्हणाले की,रमाईच गीत गाताना प्रा.अहिरराव रडले होते,त्यांनी कर्ज काढून गाण्यांच्या रेकॉर्ड बनविल्या होत्या.कवी प्रफुल्ल केदारे म्हणाले की,अरुण अहिरराव सरांचा अरुनोदय हा कविता संग्रह गाजला होता. प्रा.डॉ.महेंद्र दहिवले म्हणाले की,अहिरराव हे शाहिरी परंपरेचे गायक होते.रिपब्लिकन पार्टी (आठवले)पक्षाचे ठाणे प्रदेश सचिव श्याम शेवाळे म्हणाले की,सन 2000 साली आम्ही अंबरनाथ पूर्वेला जयंती महोत्सव सुरु करून निळे वादळ निर्माण केले होते त्यात अहिरराव आणि हंडोरे यांचा मोलाचा वाटा होता.
प्रा.डॉ.राजेंद्र कारंकाळ यांनी कॉलेज जीवनातील प्रसंग कथन केले.एस एन डी टी कॉलेज पुणे येथील प्राद्यापिका वनश्री बैसाणे,आणि राजश्री बैसाणे यांनी अहिरराव यांच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेतला.त्या म्हणाल्या की,प्रा.अहिरराव हे आमचे मामा,त्यानी आमच्या सर्व नातेवाईकांना वेळो वेळी मदत केली.बाळू मामा सिरीयल मधील अभिनेते सुनील जगताप म्हणाले की,आमच्या नाट्य परंपरेतील एक गुणी कलाकार आम्ही गमावला आहे.अहिरराव यांच्याशी शेवटचा संवाद साधनारे कडुडोस लेखक माजी नगरसेवक शांताराम निकम यांनी शेवटचा प्रसंग कथन केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल हंडोरे यांनी केले.या श्रद्धांजली सभेत प्रा.राहुल वारडे,परिवर्तन एक लोक चळवळीचे अध्यक्ष पत्रकार राजकुमार सुर्वे, समाजसेवक ऍड.वाळुंज सर,जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा नयनाताई ठाकरे,वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्षा पदमाताई इंगळे,बागुल गुरुजी,जयंत ब्राहमने,गणेश इंगोले,सीताराम शिर्के आदीची श्रद्धांजली पर भाषणे झाली.गायक पंजाबराव मेश्राम,भूषण भावे यांनी श्रद्धांजली वाहणारी गिते सादर केली.
पत्रकारिता जनकल्याण का मयाम है। एक पत्रकार
का काम नई जानकारी को उजागर करना और उस
जानकारी को एक संदभ में रखना है। ताकी उस
जानकारी का इस्तेमाल मानव की स्थिती को सुधारने में काम आये.
Back to top button
error: Content is protected !!